पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ५० दिवसांपासून घरगुती व व्यावसायिक गॅस टंचाई गंभीर बनली आहे. पुरवठा कमी असल्याने नागरिकांना १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत (Pcmc Gas Shortage) आहे.
पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या ५० दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आखाती देशांतील तणावामुळे मार्चच्या सुरुवातीला सुरू झालेली ही समस्या अद्याप कायम असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत (Pcmc Gas Shortage)आहे.
शहरातील गॅसची दैनंदिन मागणी ५६ हजारांवरून थेट १ लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र पुरवठा अद्याप ५६ हजार सिलिंडरपर्यंतच मर्यादित असल्याने सुमारे २५ लाख सिलिंडरचा बॅकलॉग निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅससाठी १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत (Pcmc Gas Shortage) आहे.
व्यावसायिक गॅसच्या बाबतीत परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. शासनाने ५० टक्के पुरवठ्याचे निर्देश दिले असताना कंपन्यांकडून केवळ २० टक्के पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे उद्योग आणि इतर व्यावसायिकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले (Pcmc Gas Shortage) आहे.
दरम्यान, ई-केवायसी अपूर्ण असणे, पत्त्यातील बदल आणि वितरणातील तांत्रिक अडचणी यामुळेही समस्या वाढल्याचे गॅस एजन्सी चालकांचे म्हणणे(Pcmc Gas Shortage) आहे.
प्रशासनाने काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांनी तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून होत (Pcmc Gas Shortage) आहे.
