Home राजकारण आमदार शंकर जगताप यांचा ‘पत्ता ओपन’ | शिवसेना उबाठा गटाला धक्का

आमदार शंकर जगताप यांचा ‘पत्ता ओपन’ | शिवसेना उबाठा गटाला धक्का

शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश | पिंपरी चिंचवड राजकारण

by Admin
Spread the love

पिंपरी चिंचवड राजकारणात खळबळ!
आमदार शंकर जगताप यांचा ‘पत्ता ओपन’ — उबाठा गटाला मोठा धक्का!
शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश

📍 पिंपरी | प्रतिनिधी | ११ नोव्हेंबर

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार शंकर जगताप (shankar-jagtap-bjp )यांनी आपली रणनीती प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे.
एका बाजूला नागरिकांशी संवाद साधत आणि कार्यकर्त्यांना बळ देत असताना, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणत त्यांनी “पत्ते ओपन” केले आहेत.

अलीकडेच शिवसेना (उबाठा गट) सोडून माजी नगरसेवक दिवंगत रघुनाथ वाघ यांच्या पत्नी व उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ यांनी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय  (shankar-jagtap-bjp )वर्तुळात बोलले जात आहे.


भाजपकडून शंकर जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी

तीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या निवडणुकीचे रणांगण सजले आहे. भाजपने शांत, संयमी आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून ओळख असलेल्या आमदार शंकर जगताप यांच्यावर निवडणुकीची कमान सोपवली आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सोसायट्या, गृहनिर्माण संस्था आणि (shankar-jagtap-bjp )नागरिकांच्या भेटीगाठींमधून संवाद मेळावे आयोजित केले जात आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांच्या तातडीच्या तोडग्यांवर भर दिला जात आहे.


उबाठा गटात खळबळ

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारताच आमदार जगताप यांनी उबाठा गटात धडक दिली आहे.
रजनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रभाग क्रमांक १७ मधील आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, तसेच (shankar-jagtap-bjp )भाजपचे वरिष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रमुख

सुरेखा वाघ, मंदाकिनी वाघ, सारिका बागुल, रवींद्र पाटील, वंदना पाटील, रमेश भदाणे, सुनंदा भदाणे, रमेश बिरारी, प्रदीप भदाणे, रामेश्वर ईशी, नितीन पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विठोबा महाजन, पल्लवी वाघ, रवींद्र महाजन, नितीन महाजन, भाऊसाहेब महाजन, भाऊसाहेब पेंटर, प्रशांत अहिरे, युवराज अहिरे, आशा अहिरे, पूजा अहिरे, वाल्मीक पाटील, गायत्री पाटील, रवींद्र जगताप, आर. के. महाजन, योगेश माळी आदींचा (shankar-jagtap-bjp ) समावेश आहे.


रजनी वाघ यांचा विश्वास

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या सत्ताकाळात शहरात मेट्रो रस्त्यांचे जाळे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय, आणि नवनवीन प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट झाला आहे. नागरिकांचा भाजपवर विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आग्रह आणि नागरिकांचा पाठिंबा पाहता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे रजनी रघुनाथ (shankar-jagtap-bjp ) वाघ यांनी सांगितले.


आमदार जगताप यांचा आत्मविश्वास

भाजपने पिंपरी चिंचवड शहराची निवडणूक जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली जाईल. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार सक्षम असून, कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक यशस्वी ठरेल.
या निवडणुकीत महापौर हा भाजपचाच असेल, असा विश्वास (shankar-jagtap-bjp )आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00