Home तंत्रज्ञान Ravi Landge Initiative :भोसरी–चाकणमध्ये ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्र’ सुरू

Ravi Landge Initiative :भोसरी–चाकणमध्ये ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्र’ सुरू

भोसरी आणि चाकण येथे महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून मोफत रोजगार व करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू. युवकांसाठी शून्य खर्चात नोकरी संधी.

by Admin
Spread the love

भोसरी (प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२६) : रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरात येणाऱ्या युवकांची फसवणूक थांबवण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौकाजवळ या केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते( Ravi Landge Initiative) झाले.

 

या केंद्रामार्फत नोंदणी, नोकरीच्या संधी, करिअर मार्गदर्शन तसेच राहण्याबाबत सल्ला अशा सर्व सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. आर्थिक अडचणीमुळे मागे पडणाऱ्या युवक-युवतींना कोणताही खर्च न करता नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश ( Ravi Landge Initiative)आहे.

 

दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच पदवीधर उमेदवारांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. भोसरी आणि चाकण येथे ही सुविधा उपलब्ध असून आतापर्यंत सुमारे दोन हजार युवकांनी याचा लाभ घेतला आहे. तरुणांनी फसवणूक टाळून या मोफत सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर लांडगे यांनी( Ravi Landge Initiative) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00