Home गुन्हे Praveen Jain PCMC:PCMC मध्ये ६० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; मारुती भापकर यांची सखोल चौकशीची मागणी

Praveen Jain PCMC:PCMC मध्ये ६० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; मारुती भापकर यांची सखोल चौकशीची मागणी

मुख्य लेखा अधिकाऱ्यांसह अधिकारी, ठेकेदार आणि काही नगरसेवकांवर संगनमताचा आरोप; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुमारे ६० कोटी १८ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. या प्रकरणात लेखा विभागातील अधिकारी, संबंधित विभागांचे कर्मचारी, ठेकेदार, सल्लागार आणि काही नगरसेवकांनी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने निधी अदा केल्याचा आरोप करत त्यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडे सविस्तर निवेदन दिले  (Praveen Jain PCMC) आहे.

 

भापकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन २०२६-२७ चे बजेट मंजूर व लॉक झाल्यानंतरही संबंधित कामांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसताना मार्च २०२६ अखेरीस विविध विभागांच्या कामांची कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली. पाणीपुरवठा, स्थापत्य, बीआरटी, मोशी, तळवडे, भोसरी आणि नाशिक फाटा आदी विभागांतील ६० ते ७० कामांशी संबंधित ही बिले असल्याचा दावा करण्यात आला (Praveen Jain PCMC)आहे.

 

या प्रकरणात महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांनी प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून ठेकेदारांना परस्पर देयके अदा केल्याचे भापकर यांनी म्हटले आहे. तसेच काही नगरसेवकांच्या सह्या घेऊन कथित “बोगस उपसूचना” तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला (Praveen Jain PCMC)आहे.

 

भापकर यांनी या व्यवहारांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित नगरसेवकांच्या सह्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच या सर्व व्यवहारांमध्ये लेखा विभाग, संबंधित अभियंते, ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांचे संगनमत होते का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली (Praveen Jain PCMC)आहे.

 

दरम्यान, महापालिकेने याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीवरही भापकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित कामांशी निगडित अधिकाऱ्यांचाच समितीत समावेश केल्याने चौकशी निष्पक्ष होणार नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे प्रामाणिक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली (Praveen Jain PCMC)आहे.

 

याशिवाय, महापालिकेच्या मुदत ठेवी (FD) मोडण्याच्या प्रक्रियेतही नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँक निवडीतील कथित अनियमितता आणि पुनर्गुंतवणुकीतील विलंबामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला(Praveen Jain PCMC) आहे.

 

या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय स्तरावर चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच दोषी आढळणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली(Praveen Jain PCMC) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00