Home गुन्हे Ravi Landge:महापौर रवी लांडगे यांना धमकी; चिखलीतील व्यक्तीला भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात

Ravi Landge:महापौर रवी लांडगे यांना धमकी; चिखलीतील व्यक्तीला भोसरी पोलिसांनी घेतले ताब्यात

महापौर रवी लांडगे यांना धमकी देणारा तरुण काही तासांत पोलिसांच्या ताब्यात; मानसिक नैराश्यातून फोन केल्याची कबुली

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून ताब्यात घेतले. पोलिस तपासात संबंधित व्यक्ती मानसिक नैराश्यात असल्याचे समोर आले असून, चौकशीनंतर पोलिसांनी त्याला समज देऊन नातेवाईकांच्या ताब्यात (Ravi Landge)सोडले.

आशिष जमदाडे पाटील (रा. चिखली) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. तो भोसरी एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी (Ravi Landge)दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आशिष याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान’ हेल्पलाईनवर फोन केला. या फोनवरून त्याने महापौर रवी लांडगे यांना मारण्याची धमकी दिल्याने पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंग सुरू (Ravi Landge)केले.

तपासादरम्यान पोलिसांनी चिखली परिसरातून आशिषला ताब्यात घेत भोसरी पोलीस ठाण्यात आणले. चौकशीमध्ये त्याने मानसिक तणाव आणि नैराश्यातून हा फोन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली असता, त्याची मानसिक स्थिती काही काळापासून अस्थिर असल्याचेही समोर(Ravi Landge) आले.

प्राथमिक चौकशीनंतर कोणताही गंभीर कट अथवा इतर संशयास्पद बाब आढळून न आल्याने पोलिसांनी त्याला समज देत नातेवाईकांच्या ताब्यात घरी पाठवले. मात्र, भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करू नये, अशी कडक ताकीदही पोलिसांनी दिली (Ravi Landge)आहे.

दरम्यान, या घटनेमुळे काही काळ शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पावधीत संबंधित व्यक्तीचा शोध घेतल्याने संभाव्य गैरप्रकार टळल्याचे बोलले जात(Ravi Landge) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00