Home संस्कृती Indian Culture:भारतीय संस्कृतीचा जागर : १६ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

Indian Culture:भारतीय संस्कृतीचा जागर : १६ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभाग आणि सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. “भारतीय संस्कृती व जीवन मूल्ये” या विषयावर डॉ. अभयजी कुलकर्णी व राजेंद्र घावटे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.

by Admin
Spread the love

निगडी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभाग आणि सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज, निगडी येथे उत्साहात पार पडला. यंदाचा विषय होता – “भारतीय संस्कृती व जीवन (Indian Culture )मूल्ये”.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रास्ताविकाने झाली. प्रमुख पाहुणे डॉ. अभयजी कुलकर्णी (संचालक – IICMR) यांनी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्ये आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मूल्यनिष्ठ नागरिक बनण्याचे आवाहन (Indian Culture ) केले.

प्रमुख वक्ते ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी भारतीय परंपरा, कुटुंबव्यवस्था आणि संस्कार यांचे महत्त्व स्पष्ट करत राष्ट्रीय चारित्र्य घडविणाऱ्या शिक्षणाची गरज व्यक्त केली. त्यांच्या प्रेरक भाषणाने विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त(Indian Culture ) केले.

सुमारे १५० विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. शेवटी आभार प्रदर्शन व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्याचा प्रेरणादायी संदेश या सोहळ्यातून देण्यात (Indian Culture )आला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00