पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी २०२६: “नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते,” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रम हिवरेबाजार (जि. अहिल्यानगर) येथे पार (Kavyajagar Hivarebajar) पडला.
महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार अध्यक्षस्थानी होते, तर स्वागताध्यक्षपदी बाजीराव सातपुते होते. इंद्रजित पाटोळे, राजेंद्र वाघ, सरपंच विमल ठाणगे आदी मान्यवर उपस्थित (Kavyajagar Hivarebajar)होते.
यावेळी हिवरेबाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाला ‘पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षणसंस्था’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रभावती विठ्ठल वाघ, अॅड. सतीश गोरडे, म. भा. चव्हाण आणि कवयित्री मानसी चिटणीस यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कवी-कलावंतांनी सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन करून काव्यजागर(Kavyajagar Hivarebajar) साकारला.
डॉ. सबनीस म्हणाले, “स्त्री, कामगार, कष्टकरी, दलित आणि वंचित यांच्यातील माणसाचा सन्मान सुर्वे यांनी आपल्या कवितेतून केला. गांधीवाद आणि मार्क्सवाद यांची सांगड त्यांच्या विचारांत दिसते.” अध्यक्षीय मनोगतात पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांना काव्यलेखनाची प्रेरणा घेण्याचे आवाहन(Kavyajagar Hivarebajar) केले.
बालविद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन, तर अरुण गराडे यांनी आभार प्रदर्शन (Kavyajagar Hivarebajar)केले.
