Home माझं पिंपरी चिंचवड PCMC BJP Meeting:पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेवकांची आढावा बैठक उत्साहात संपन्न

PCMC BJP Meeting:पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेवकांची आढावा बैठक उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकांची आढावा बैठक संपन्न. स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; विकासकामे व आगामी कार्ययोजनांवर चर्चा.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीस शहरातील सर्व कार्यकारिणी सदस्य व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित ( PCMC BJP Meeting) होते.

बैठकीच्या सुरुवातीस महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून विनम्र अभिवादन ( PCMC BJP Meeting) केले.

या बैठकीस भाजप शहराध्यक्ष मा. श्री. बापू काटे, आमदार श्री. महेशदादा लांडगे, आमदार श्री. शंकरशेठ जगताप तसेच आमदार मा. उमाताई खापरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अनुभवी नेतृत्वातून नगरसेवकांना आगामी काळातील कामकाजासाठी स्पष्ट दिशा व प्रेरणा ( PCMC BJP Meeting) मिळाली.

बैठकीदरम्यान शहरातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संघटनात्मक बळकटीकरण, जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधणे आणि आगामी कार्ययोजनांची आखणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन, समन्वय आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर पुढील वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात ( PCMC BJP Meeting) आला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00