Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Youth Accident :पिंपरी-चिंचवडच्या तरुणांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, शहरावर शोककळा

PCMC Youth Accident :पिंपरी-चिंचवडच्या तरुणांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, शहरावर शोककळा

पिंपरी-चिंचवडमधील तरुण लेह-लडाख पर्यटनावरून परतत असताना राजस्थानच्या कोटा येथे भीषण अपघातात तिघांचा मृत्यू. शहरात शोककळा.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काही तरुणांचा आनंदाचा प्रवास दुर्दैवाने शोकांतिकेत बदलला. परतीच्या प्रवासादरम्यान बुधवारी (१८ मार्च) राजस्थानमधील कोटा शहराजवळ त्यांच्या एका कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत (PCMC Youth Accident) आहे.

 

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे तरुण तीन कारमधून पर्यटनासाठी रवाना झाले होते. प्रवासादरम्यान काही जणांची प्रकृती बिघडल्यामुळे तीन मित्र गेल्याच आठवड्यात परतले होते. उर्वरित मित्र राजस्थानमार्गे परतत असताना कोटा जवळ महामार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात (PCMC Youth Accident)झाला.

 

या घटनेबाबत माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, अपघात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात झाला असून त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करून आवश्यक मदत पुरवण्यात (PCMC Youth Accident)आली.

 

मृतांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तिघांचे पार्थिव गुरुवारी (१९ मार्च) पिंपरी-चिंचवडमध्ये आणले जाणार असल्याचेही बारणे यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात(PCMC Youth Accident) आहे.

 

दरम्यान, या तरुणांना प्रवासादरम्यान काही अडचणींचाही सामना करावा लागला होता. लेह-लडाखमधील कारगिल परिसरात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने ते सुमारे पाच दिवस अडकून पडले होते. त्यावेळी बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली (PCMC Youth Accident)आहे.

 

या दुर्दैवी अपघातामुळे पिंपरी-चिंचवड शहरात शोक व्यक्त केला जात असून, नागरिकांकडून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येत(PCMC Youth Accident) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00