पुणे/पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात, विशेषतः अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘देश भगत युनिव्हर्सिटी (DBU) अमेरिका’तर्फे नवीन आंतरराष्ट्रीय वैद्यकीय अभ्यासक्रम लॉन्च करण्यात आले आहेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तसेच आकुर्डी येथे आयोजित “Growth Strategy Meet 2026” या कार्यक्रमात या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात (Desh Bhagat University)आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हर्ष सदावर्ती आणि ऑपरेशन्स डायरेक्टर अरुण मलिक यांनी या अभ्यासक्रमाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, भारतातील मर्यादित व महागड्या एमबीबीएस शिक्षणाला पर्याय म्हणून हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार (Desh Bhagat University) आहे.
या नव्या उपक्रमांतर्गत ४ वर्षांचा आणि ५ वर्षांचा ‘एमडी’ (MD) प्रोग्राम उपलब्ध असून, तो भारतातील ‘एमबीबीएस’ (MBBS) पदवीच्या समकक्ष मानला जातो. विशेष म्हणजे, भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत हा अभ्यासक्रम अत्यंत परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध करून देण्यात आला (Desh Bhagat University)आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आंतरराष्ट्रीय मान्यता. विद्यार्थ्यांना अमेरिकेतील USMLE, तसेच यूके आणि कॅनडा येथील वैद्यकीय परवाना परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर डॉक्टर म्हणून करिअर घडवण्याची संधी उपलब्ध होणार(Desh Bhagat University) आहे.
अभ्यासक्रमाची रचना ही तीन वर्षांच्या सैद्धांतिक शिक्षणासोबत दोन वर्षांच्या क्लिनिकल रोटेशनवर आधारित असून, विद्यार्थ्यांना जगभरातील विविध रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे त्यांना व्यावहारिक अनुभवासोबतच आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेची ओळख होणार (Desh Bhagat University)आहे.
प्रवेशासाठी १०+२ सायन्स शाखा पूर्ण केलेले आणि ‘नीट’ (NEET) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. याशिवाय, ‘D-Best Global MD’ या विद्यापीठाच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार(Desh Bhagat University) आहे.
दरम्यान, १८ मार्च २०२६ रोजी आकुर्डी येथील ग्रँड Exotica येथे आयोजित “Growth Strategy Meet 2026” कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात उपकुलगुरू डॉ. हर्ष सदाबर्ती यांनी भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी अशा अभ्यासक्रमांची गरज अधोरेखित (Desh Bhagat University)केली.
या वेळी व्यासपीठावर प्रेसिडेंट 2ओएसडी अमित कुकरेजा, MBBS डायरेक्टर अरुण मलीक, मृत्युंजय हिरेमठ, बबिता सिरस्वा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सीनियर मार्केटिंग मॅनेजर दिनेश सिंह, कार्यक्रम आयोजक सिंटू सिंग आणि करिअर क्राफ्ट एज्युकेशनल सर्व्हिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बबिता सिरस्वा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन(Desh Bhagat University) केले.
कार्यक्रमात संस्थेच्या भविष्यातील विस्तार योजना, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधनाच्या संधी आणि जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः School of Medicine अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या MD (MBBS) कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अमेरिका, यूके आणि इतर देशांमध्ये करिअर करण्याचे दरवाजे खुले होत असल्याचे अधोरेखित करण्यात (Desh Bhagat University)आले.
“भारतात एमबीबीएसच्या जागा मर्यादित आणि खर्चिक आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स येथील कॅम्पसमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत,” असे डॉ. हर्ष सदावर्ती यांनी स्पष्ट(Desh Bhagat University) केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पदवीच नव्हे, तर जागतिक स्तरावर करिअर घडवण्याची संधी मिळणार असून, शैक्षणिक क्षेत्रात नवी दिशा निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात (Desh Bhagat University)आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नीता यादवाड यांनी प्रभावीपणे पार (Desh Bhagat University)पाडले.
