Home महाराष्ट्र Gudhi Padva Celebration :निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात प्रभात फेरीतून गुढी पाडव्याचे स्वागत

Gudhi Padva Celebration :निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात प्रभात फेरीतून गुढी पाडव्याचे स्वागत

निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रभात फेरीचे आयोजन; २०० हून अधिक विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग.

by Admin
Spread the love

निगडी : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात नववर्षाचे स्वागत पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यालयाच्या केंद्राच्या वतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थी, युवक, पालक आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी (Gudhi Padva Celebration) झाले.

 

प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी “उत्तम पुरुष लक्षणे”, “मनाचे श्लोक”, अभंग आणि विविध पद्यांचे सादरीकरण करत जयघोष केला. या घोषणांनी परिसर भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. विशेष म्हणजे, सुमारे २० महिलांचे टाळ पथकही या प्रभात फेरीत सहभागी झाले होते. त्यांच्या तालबद्ध सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी (Gudhi Padva Celebration)वाढली.

 

गुढी पाडवा हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने विविध पारंपरिक उपक्रमांद्वारे त्याचे स्वागत करण्याची परंपरा आहे. ज्ञान प्रबोधिनी विद्यालय आणि हिंदू संस्कृती यांचे नाते अतिशय घट्ट असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक केली (Gudhi Padva Celebration)जाते.

 

या कार्यक्रमानंतर केंद्रात विधिवत पूजा व इतर कार्यक्रम पार पडले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण उपक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार(Gudhi Padva Celebration) पडला.

 

या सुंदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीविषयी अभिमान निर्माण झाला असून, नववर्षाचे स्वागत सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात (Gudhi Padva Celebration)आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00