Home महाराष्ट्र Police Raid:निगडी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, ८ जण अटकेत

Police Raid:निगडी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, ८ जण अटकेत

निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली. छाप्यात ७,५४० रुपये रोख व पत्ते जप्त

by Admin
Spread the love

निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात नॉर्थ ईस्टर्न कॅरिंग कार्पोरेशन कंपनीजवळील मोकळ्या जागेत पत्त्यांवर पैसे लावून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १४ डिसेंबर रोजी रात्री (Police Raid) करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत उदधवराव पतंगे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी राकेश संजय पाटील (३२, बिजलीनगर, चिंचवड), सतिष अर्जुन कोळी (३८, त्रिवेणीनगर, चिखली), शिवाजी राजेंद्र शेंडगे (५२, रुपीनगर, निगडी), शिवाजी संग्राम वजरकर (५०, मोरवस्ती, चिखली), ओमप्रकाश प्रभाकर जगताप (४२, रुपीनगर, निगडी), गुलाब रियाज अली (३३, दत्तनगर, निगडी), तानाजी महादेव नायकुडे (३२, रुपीनगर, निगडी) आणि वामन राजेंद्र शेंडगे (५५, चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Police Raid) आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रान्सपोर्ट नगर येथील मोकळ्या जागेत पत्यांच्या पानांवर रक्कम लावून ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून ७ हजार ५४० रुपये रोख रक्कम आणि पत्त्यांची पाने असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत (Police Raid) आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00