Home प्रेरणा / यशकथा Kavyatma Sohla:काव्यात्मा सन्मान सोहळा २०२५ : ज्येष्ठ कवी बाबू डिसूझा, दीपक अमोलिक, किशोर केदारी आणि बाबाजी मगदूम सन्मानित

Kavyatma Sohla:काव्यात्मा सन्मान सोहळा २०२५ : ज्येष्ठ कवी बाबू डिसूझा, दीपक अमोलिक, किशोर केदारी आणि बाबाजी मगदूम सन्मानित

कवी बाबू डिसूझा, दीपक अमोलिक, बाबाजी मगदूम आणि किशोर केदारी यांना विविध साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कवी संमेलनात ३५ हून अधिक कवींनी सहभाग नोंदवला.

by Admin
Spread the love

Kavyatma Sohla

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ होते. तसेच वृक्षमित्र अरुण पवार, आप्पा कसबेकर, संदीप तापकीर, मदन देगांवकर, महादेव रोकडे आणि काव्यात्मा साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे या मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांच्या शुभहस्ते पुरस्कार (Kavyatma Sohla) प्रदान करण्यात आले.

मनोगतात बोलताना पुरुषोत्तम सदाफुळे म्हणाले, प्रामाणिकपणे कवितेची सेवा केली तर कविता आयुष्यभर गोड फळे देते. अध्यक्षीय भाषणात कामगार भूषण राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, कविता हे कवीचे अपत्य असते, त्यामुळे त्याची जबाबदारीही मोठी असते. निर्भिडपणा आणि स्पष्टता असलेली कविता समाजपरिवर्तन घडवू शकते; अन्यथा ती कचरा पेटीत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट  (Kavyatma Sohla) केले.

काव्यात्मा साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे यांनी प्रास्ताविक केले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री प्रतिमा काळे(Kavyatma Sohla) यांनी केले.

दुसऱ्या सत्रातील निमंत्रित कवी संमेलनात योगिता कोठेकर, माधुरी वैद्य डिसूझा, लक्ष्मण माने, आनंद गायकवाड, संभाजी रणसिंग, प्रशांत पाटोळे, अशोक वाघमारे, संजय चव्हाण यांच्यासह सुमारे ३५ कवींनी विविध विषयांवर आपली कविता सादर केली. या संमेलनाचे सूत्रसंचालन अनिल नाटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवी दादाभाऊ(Kavyatma Sohla) ओव्हाळ यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00