Home गुन्हे PCMC Scam News:वाढ-घट उपवर्गीकरणातील ६० कोटींच्या कथित बोगस उपसूचनांचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

PCMC Scam News:वाढ-घट उपवर्गीकरणातील ६० कोटींच्या कथित बोगस उपसूचनांचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वाढ-घट उपवर्गीकरण प्रकरणातील कथित ६० कोटींच्या बोगस उपसूचनांबाबतचा चौकशी अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १९ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील वाढ-घट उपवर्गीकरण प्रकरणातील कथित ६० कोटी रुपयांच्या बोगस उपसूचनांबाबतचा चौकशी अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली (PCMC Scam News) आहे.

 

यासंदर्भात त्यांनी महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांना निवेदन दिले (PCMC Scam News) आहे.

 

भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, दि. १५ मे २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाढ-घट उपवर्गीकरण प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच हा अहवाल पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगत त्याची प्रत महापौरांना देण्यात येणार असल्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले(PCMC Scam News) होते.

 

मात्र, या घोषणेनंतर पाच दिवस उलटूनही अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील सुमारे ३० लाख करदात्या नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला असल्याचे भापकर यांनी म्हटले (PCMC Scam News) आहे.

 

या संपूर्ण प्रकरणात चौकशी समिती आणि प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेची वस्तुस्थिती नागरिकांसमोर यावी, यासाठी महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केली (PCMC Scam News) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00