Home तंत्रज्ञान Nigdi Metro Work:मेट्रोच्या खोदकामादरम्यान पाणीवाहिनी फुटली; निगडी परिसरातील नागरिकांची तारांबळ

Nigdi Metro Work:मेट्रोच्या खोदकामादरम्यान पाणीवाहिनी फुटली; निगडी परिसरातील नागरिकांची तारांबळ

भक्ती शक्ती उड्डाणपूलाखाली मेट्रोच्या खोदकामादरम्यान पाणीवाहिनी फुटल्याने निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना.

by Admin
Spread the love

निगडी, दि. २८ मे २०२६ — भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण मुंबई-पुणे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मेट्रो प्रकल्पासाठी जेसीबी मशीनद्वारे करण्यात येत असलेल्या खोदकामावेळी (दि. २७) रात्री मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. या घटनेमुळे परिसरातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला (Nigdi Metro Work) होता.

 

घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला. पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक भागांत सकाळपर्यंत पाणी न आल्याने नागरिकांची तारांबळ (Nigdi Metro Work)उडाली.

 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पाण्याची टंचाई जाणवत असताना अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पाच्या कामांदरम्यान संबंधित यंत्रणांनी अधिक काळजी घेणे आवश्यक होते. निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त (Nigdi Metro Work) केली.

 

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली असून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात (Nigdi Metro Work)आली.

 

दरम्यान, मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे वारंवार नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रस्त्यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि आता पाणीपुरवठा खंडित झाल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अधिक नियोजनबद्ध कामकाजाची मागणी केली (Nigdi Metro Work)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00