Home आरोग्य Pcmc Water Supply:पिंपरी-चिंचवडमध्ये 28 एप्रिलला सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; 29 एप्रिलला कमी दाबाने पाणी

Pcmc Water Supply:पिंपरी-चिंचवडमध्ये 28 एप्रिलला सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; 29 एप्रिलला कमी दाबाने पाणी

निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीमुळे शहरातील सर्व भागांवर परिणाम; नागरिकांना पाण्याचा साठा करण्याचे आवाहन

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्र. २३ तसेच विविध क्षेत्रीय स्तरांवरील स्थापत्य आणि विद्युत देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार (Pcmc Water Supply)आहेत.

 

या पार्श्वभूमीवर मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्या दिवशी शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता (Pcmc Water Supply)आहे.

 

नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी माहिती मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी (Pcmc Water Supply)दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00