Home माझं पिंपरी चिंचवड संत नगर येथे हरिनाम सप्ताहास भव्य प्रारंभ | Harinam Saptah:हनुमान मंदिर ट्रस्ट १२ वा तपपूर्ती सोहळा

संत नगर येथे हरिनाम सप्ताहास भव्य प्रारंभ | Harinam Saptah:हनुमान मंदिर ट्रस्ट १२ वा तपपूर्ती सोहळा

भोसरीचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे पाटील यांच्या उपस्थितीत संत नगर येथे प्रथमच हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :संत नगर मित्र मंडळ तसेच भूगोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर ट्रस्टचा बारावा तपपूर्ती सोहळा आज अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने संत नगर येथे प्रथमच भव्यदिव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला (Harinam Saptah)आहे.

या सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. नाना वाळुंज, कार्याध्यक्ष श्री. स्वप्निलशेठ संजीव गाढवे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि सुंदर पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परिश्रम( Harinam Saptah)घेतले.

या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला भोसरीचे प्रथम आमदार श्री. विलासशेठ लांडे पाटील तसेच विक्रांतदादा विलासशेठ लांडे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठबळामुळे हा हरिनाम सप्ताह अधिक भव्य स्वरूपात साकार (Harinam Saptah)झाला.

या हरिनाम सप्ताहामुळे संत नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील वारकरी संप्रदाय, ज्येष्ठ नागरिक, तसेच अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांना एकत्र येण्याची आणि भक्तीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. संपूर्ण परिसरात भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले(Harinam Saptah) आहे.

या उपक्रमाबद्दल संत नगर व परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि भाविकांकडून आयोजक मंडळ, पदाधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात येत(Harinam Saptah) आहेत.

https://youtube.com/watch?v=R_kDm–wYkM&si=pq17a8M3Mfo5D1pa


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00