Home गुन्हे Wakad School Accident :वाकडमधील आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्दैवी दुर्घटना; सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Wakad School Accident :वाकडमधील आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्दैवी दुर्घटना; सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

वाकड परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी स्लायडिंग गेट कोसळून सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून निष्काळजीपणाबाबत कारवाईची मागणी होत आहे.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी): वाकड परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेत घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी स्लायडिंग गेट उघडत असताना ते अचानक त्यांच्या अंगावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत तसेच व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत(Wakad School Accident)  आहे.

 

मृत सुरक्षा रक्षकाचे नाव संजय नागनाथ कांबळे (वय ५२, रा. ताथवडे) असे आहे. २३ जुलै रोजी सकाळी शाळेची बस आल्यानंतर प्रवेशद्वाराचे स्लायडिंग गेट उघडत असताना अचानक जड लोखंडी गेट त्यांच्या अंगावर कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

या घटनेनंतर शाळेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गेटची नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का, सुरक्षेचे आवश्यक ऑडिट झाले होते का, तसेच अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या का, याबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

या प्रकरणाची नोंद वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

दरम्यान, या दुर्घटनेत निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधासह लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून होत (Wakad School Accident)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00