पिंपरी-चिंचवड :गुन्हे शाखा युनिट 01 ने प्रभावी कारवाई करत विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन एकूण 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 कडील पोलीस कर्मचारी पिंपरी येथील संत तुकारामनगर हद्दीत बंदोबस्त व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई विजय जानराव (2722) व तेजस भालचिम (3056) यांनी परिसरातील सुमारे 100 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे संशय अधिक बळकट (Crime News Unit 3) केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सपोफौ प्रमोद वेताळ, पोलीस हवालदार जयवंत राऊत (832), अजय डगळे (888), देवा राऊत (1603) तसेच महिला पोलीस हवालदार उषा दळे (519) यांच्या पथकाने श्री छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई बोर्डाजवळ, पिंपरी येथे सापळा रचून विधी संघर्षित बालकास शिताफीने ताब्यात (Crime News Unit 3) घेतले.
ताब्यात घेतलेल्या बालकाच्या कबुली जबाब व पंचनाम्याद्वारे त्याच्या ताब्यातून खालील तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या –
होंडा शाईन – MH 14 GR 0690
हिरो होंडा CD डॉन – MH 15 BB 1503
हिरो स्प्लेंडर – MH 09 CD 4583
या तिन्ही वाहनांची एकूण किंमत अंदाजे 1,55,000 रुपये आहे.
या कारवाईमुळेसंत तुकारामनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 398/2025,
संत तुकारामनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 584/2025,
एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 769/2025,
असे भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये दाखल असलेले तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले(Crime News Unit 3) आहेत.
गुन्हे शाखा युनिट 01 च्या या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत (Crime News Unit 3) आहे.
