26
पिंपरी चिंचवड : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ यांच्या वतीने होलिकोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक फुलांनी धूलिवंदन साजरे करत “रंगात रंगुनी साऱ्या” या विडंबन, उपहास आणि विनोदी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले (Navyug kavyasammelan) आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, ३ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. इच्छुक कवींनी आपली एक स्वरचित कविता २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवावी. निवडक २० कवींना सादरीकरणाची संधी दिली जाणार असून निवडीचे अधिकार संचालक मंडळाकडे राखीव (Navyug kavyasammelan)राहतील.
कविता पाठवण्यासाठी व अधिक माहितीसाठी राजेंद्र घावटे (८८८८४३४३३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले (Navyug kavyasammelan)आहे.
