Home माझं पिंपरी चिंचवड Kailas Kadam Resignation:पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचा राजीनामा | काँग्रेस बातमी

Kailas Kadam Resignation:पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचा राजीनामा | काँग्रेस बातमी

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी वैयक्तिक कारणास्तव शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र ते काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य म्हणून पुढेही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि. २२) आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला. दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष खासदार सोनिया गांधी व राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार डॉ. कदम यांची पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली  (Kailas Kadam Resignation ) होती.

काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना डॉ. कदम यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच घरोघरी काँग्रेसचे चिन्ह पोहोचवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. सोमवारी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा  (Kailas Kadam Resignation ) राजीनामा दिला.

के. सी. वेणुगोपाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात डॉ. कदम यांनी नमूद केले आहे की, “दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मिळालेल्या नियुक्तीपत्रानुसार मी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मात्र, आज सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी वैयक्तिक कारणास्तव मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मला कार्यमुक्त करण्यात यावे. मी पुढे काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून काम करणार  (Kailas Kadam Resignation ) आहे.”

शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले (Kailas Kadam Resignation ) आहे.

माध्यमांशी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून मी पिंपरी चिंचवड शहर आणि औद्योगिक पट्ट्यात काँग्रेसचे काम करत आहे. १९९७ मध्ये राज्य व केंद्रात युतीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गांधीनगर, पिंपरी वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यात माझी महत्त्वपूर्ण भूमिका होती. २००७ मध्ये खराळवाडी वॉर्डमधून निर्मला कदम, तर २०१२ मध्ये गांधीनगर प्रभागातून माझ्यासह दोन्ही उमेदवार आणि खराळवाडी प्रभागातून सद्गुरु कदम यांना निवडून आणण्यात यश मिळाले. याच काळात मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदाची संधी देण्यात  (Kailas Kadam Resignation ) आली.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मला चिंचवड मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. माझे संघटन कौशल्य लक्षात घेऊनच पक्ष अडचणीत असताना काँग्रेसने माझ्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. या काळात मी पक्षवाढीसाठी शंभर टक्के योगदान दिले आहे. मी केवळ शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून पुढेही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य म्हणून सक्रिय राहणार असल्याचे डॉ. कैलास कदम (Kailas Kadam Resignation ) यांनी स्पष्ट केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00