Home प्रेरणा / यशकथा Pavnathadi 2026:महिला बचत गटांसाठी ‘पवनाथडी’ जत्रा; २५ फेब्रुवारीपासून सांगवीत रंगणार उत्सव

Pavnathadi 2026:महिला बचत गटांसाठी ‘पवनाथडी’ जत्रा; २५ फेब्रुवारीपासून सांगवीत रंगणार उत्सव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पवनाथडी जत्रा २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान सांगवी येथे. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन; महिला बचत गटांचे स्टॉल्स आणि दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २४ फेब्रुवारी २०२६ : महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ‘पवनाथडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर ही जत्रा रंगणार (Pavnathadi 2026) आहे.

जत्रेचे उद्घाटन २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार असल्याने या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली(Pavnathadi 2026) आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित या जत्रेत महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादने आणि विविध उपयुक्त साहित्याचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या माध्यमातून महिला उद्योजकतेला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला बचत गटांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन महापौरांनी केले (Pavnathadi 2026)आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, तसेच खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार (Pavnathadi 2026)आहे.

 

पवनाथडी जत्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम

(सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता)

२५ फेब्रुवारी: ‘महाराष्ट्राची मराठी बाणा’

२६ फेब्रुवारी: सुप्रसिद्ध ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम

२७ फेब्रुवारी: ऑर्केस्ट्रा – म्युझिकल स्टार्स

२८ फेब्रुवारी: ‘फोक संस्कृती’ विशेष सादरीकरण

१ मार्च: ‘द फोक लावणी’

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी आणि सांस्कृतिक रंगत वाढवणारी ही जत्रा शहरवासीयांसाठी खरेदी व मनोरंजनाचा दुहेरी आनंद ठरणार (Pavnathadi 2026)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00