Home माझं पिंपरी चिंचवड Election 2025 Voters List:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2025: प्रारूप मतदार यादी जाहीर, हरकतीसाठी कालावधी सुरू

Election 2025 Voters List:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2025: प्रारूप मतदार यादी जाहीर, हरकतीसाठी कालावधी सुरू

नागरिकांना 20 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान हरकती व सूचना दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह पक्ष तयारीत गती आणत आहेत.

by Admin
Spread the love

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Municipal Corporation Election 2025) तयारीला वेग आला आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची प्रभागनिहाय विभागणी करून तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावांबाबत हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी 20 ते 27 नोव्हेंबर 2025 हा कालावधी देण्यात आला असून, या संदर्भातील सुविधा संपूर्ण शहरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर (Election 2025 Voters List ) यांनी सांगितले.

प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रति पृष्ठ रु. 2/- या दराने सावित्रीबाई फुले सभागृह येथे विक्रीस उपलब्ध आहेत, असे निवडणूक विभागातून कळवण्यात आले (Election 2025 Voters List )आहे.

महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:

  • 27 नोव्हेंबर 2025: हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी

  • 5 डिसेंबर 2025: हरकतींवरील निर्णय व प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

  • 8 डिसेंबर 2025: मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर

  • 12 डिसेंबर 2025: मतदान केंद्रनिहाय (Election 2025 Voters List ) मतदार याद्या प्रसिद्ध

प्रारूप मतदार यादी ही आगामी निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. शहरातील प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव योग्यरित्या नोंदले आहे का, याची खात्री करून आवश्यक असल्यास हरकती व सूचना वेळेत दाखल करणे अत्यावश्यक आहे. प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाच्या नियमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे (Election 2025 Voters List )यांनी सांगितले.

दुसरीकडे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीमकडून प्रभाग निहाय सर्वेक्षण केले जात आहे. उमेदवारी प्रक्रियेला गती देत राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागवले असून 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. बहुतांश प्रभागांमध्ये दोन ते तीन उमेदवार पुढे आले (Election 2025 Voters List ) असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच, शरद पवार गटाचे नेते माधव पाटील यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील 30,000 महिलांना प्रत्येकी दहा हजार एक रुपयांचा वाटप करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज मागितले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे कारण  (Election 2025 Voters List )पुढे करत त्यांनी हे कर्ज मागितल्याने चर्चा रंगली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00