Home महाराष्ट्र PCMC Election 2025:पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक 2025: दुबार मतदार यादी पाहणीसाठी खुली

PCMC Election 2025:पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक 2025: दुबार मतदार यादी पाहणीसाठी खुली

नागरिक १ ते ९२,६६४ पर्यंतच्या नावांची पडताळणी करू शकतात आणि आवश्यक असल्यास हरकती दाखल करू शकतात.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका कार्यक्षेत्रातील  दुबार मतदारांची यादी महापालिका निवडणूक विभागाला सुपूर्द केली असून, ही यादी नागरिकांसाठी (PCMC Election 2025 )पाहणीसाठी खुली करण्यात आली आहे, असे निवडणूक विभागाने कळवले.

दुबार नावांची तपशीलवार यादी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत तसेच सावित्रीबाई फुले सभागृह आणि महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील निवडणूक विभागात उपलब्ध आहे. याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी ही यादी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर देखील (PCMC Election 2025 ) अपलोड करण्यात आली आहे.

यादीतील नावे अनुक्रमांक १ पासून सुरू होऊन ९२,६६४ एवढ्या संख्येपर्यंत नोंदवली गेली आहेत, असे महापालिका निवडणूक विभागाने सांगितले. या यादीच्या आधारे निवडणूक आयोग पुढील प्रक्रिया करून दुबार नावे वगळण्याचे (PCMC Election 2025 )काम करणार आहे.




Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00