मुंबई : आगामी श्रीलंका दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरची पहिल्या कसोटीसाठी निवड झालेली नसून, त्याच्या जागी युवा ऑफ-स्पिनर सारांश जैनला प्रथमच कसोटी संघात संधी देण्यात आली (India Test Squad) आहे.
इंग्लंडविरुद्धच्या अलीकडील वनडे मालिकेदरम्यान वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो तिसऱ्या वनडे सामन्यातही खेळू शकला नव्हता. त्याच दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यालाही मुकणार (India Test Squad)आहे.
दरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज साई सुदर्शन यांची संघात निवड करण्यात आली असली, तरी त्यांचा अंतिम सहभाग तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून असेल. गुडघ्याला सूज आल्यामुळे बुमराह इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना खेळू शकला (India Test Squad) नव्हता.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे चार दिवसांचा सराव सामना खेळणार(India Test Squad) आहे.
मालिकेचे वेळापत्रक
• ७ ऑगस्ट : चार दिवसांचा सराव सामना, कोलंबो
• १५ ऑगस्ट : पहिली कसोटी, गॅले
• २३ ऑगस्ट : दुसरी कसोटी, एसएससी (कोलंबो)
श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ : शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल आणि सारांश जैन.
साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांचा अंतिम सहभाग तंदुरुस्तीच्या मंजुरीनंतर निश्चित होणार (India Test Squad) आहे.



