Home महाराष्ट्र Pune HSRP:वाहनधारकांना मोठा दिलासा!

Pune HSRP:वाहनधारकांना मोठा दिलासा!

HSRP नंबर प्लेटची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख महाराष्ट्र परिवहन विभागाने पुन्हा एकदा वाढवली आहे. यामुळे जुन्या वाहनांच्या मालकांना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही प्लेट बसवून घेता येणार  (Pune HSRP)आहे.

केंद्र सरकारने वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी HSRP अनिवार्य केली आहे. या प्लेट्समध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने वाहनचोरी कमी होण्यास मदत होते. मात्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि राज्यातील अनेक भागांमध्ये फिटमेंट सेंटर्सवर होणारी मोठी गर्दी आणि वेळेअभावी अनेक वाहनधारकांना HSRP बसवणे कठीण झाले(Pune HSRP) होते.

३० नोव्हेंबर २०२५ ही पूर्वीची अंतिम मुदत जवळ आली तरी लाखो वाहनांचे काम प्रलंबित राहिले होते. यामुळे वाहनधारकांना मोठ्या दंडाचा सामना करावा लागू शकत होता किंवा आरटीओमधील त्यांची कामे अडकण्याची शक्यता होती. हीच अडचण टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी परिवहन विभागाने अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीमुळे सर्व राहिलेल्या वाहनधारकांना HSRP नोंदणी आणि फिटमेंट करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला (Pune HSRP)आहे.

विभागाने मात्र स्पष्ट केले आहे की ३१ डिसेंबर २०२५ नंतर कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. या तारखेनंतरही वाहनावर HSRP आढळली नाही तर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच अशा वाहनांची आरटीओतील महत्त्वाची कामे — जसे की कर्जाचा बोजा चढवणे किंवा कमी करणे — थांबवली (Pune HSRP)जातील.

म्हणूनच सर्व वाहनधारकांनी दिलेल्या अतिरिक्त वेळेचा योग्य फायदा घेत HSRP वेळेत बसवून घ्यावी आणि भविष्यातील दंड व अडचणींपासून स्वतःला वाचवावे, असे (Pune HSRP)आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00