पुणे : रंगतसंगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गझलमित्र पुरस्कार सोहळा व एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी गझल संमेलन रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे येथे होणार (Ghazalmitra Award) आहे.
या संमेलनात गझल क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, विचारमंथन, मनोगते आणि विविध मुशायऱ्यांचे आयोजन करण्यात आले असून रसिकांसाठी हा एक मेजवानीचा दिवस ठरणार (Ghazalmitra Award)आहे.
पहिले सत्र : पुरस्कार सोहळा
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन करणार आहेत. व्यासपीठावर डॉ. सदानंद मोरे, डॉ. कैलास गायकवाड, अॅड. प्रमोद आडकर, भूषण कटककर, प्रज्ञा महाजन आणि मैथिली आडकर उपस्थित राहणार (Ghazalmitra Award)आहेत.
या सत्रात डॉ. कैलास गायकवाड यांना गझलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तो डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते दिला जाईल. प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर करणार आहेत. परिचयपत्र वाचन मुक्ता भुजबले, तर सन्मानपत्र अभिवाचन अश्विनी जगताप करतील. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गायकवाड एक गझल सादर करणार आहेत. अध्यक्षीय समारोप डॉ. सदानंद मोरे करतील.
दुसरे सत्र : गझल चिंतन व मान्यवरांचा सत्कार
दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन ऋचा कर्वे करणार आहेत.
वैभव कुलकर्णी “सहज शब्दरचनेतून आशयघनता – गझलेतील एक आव्हान” या विषयावर मनोगत मांडतील, तर भूषण कटककर “गझलेला रसिकाश्रय – एक चिंतन” या विषयावर विचार मांडतील.यावेळी प्राचार्य डॉ. सतीश देवपूरकर, ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल, ज्येष्ठ कवयित्री व साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि डॉ. बाबुल पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रत्येक मान्यवरांचे पाच शेर वाचनानंतर त्यांना मंचावर आमंत्रित करण्यात(Ghazalmitra Award) येईल.
तसेच निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले, अश्विनी जगताप, वैभव कुलकर्णी, वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वासंती वैद्य आणि वैशाली माळी यांचाही सन्मान केला जाणार आहे.
पुढील सत्रे : विविध मुशायरे
यानंतर विविध मुशायऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे—
तिसरे सत्र : रंगतसंगत मुशायरा (सूत्रे – वैजयंती आपटे)
चौथे सत्र : करम मुशायरा (सूत्रे – प्राजक्ता वेदपाठक)
पाचवे सत्र : गझलविधा मुशायरा (सूत्रे – वासंती वैद्य)
सहावे सत्र : गझलविधा मुशायरा (सूत्रे – वैशाली माळी)
करम–रंगतसंगत संयुक्त समितीच्या वतीने आयोजित या संमेलनात राज्यभरातील गझलप्रेमी, कवी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Ghazalmitra Award)आहे.
