(विवेक कुलकर्णी ):दोन सलग मालिका गमावल्यानंतर टीकेचा धनी ठरलेल्या श्रेयस अय्यरने अखेर आपल्या नेतृत्वाखाली पहिला मालिका विजय मिळवत भारतीय संघाला दिलासा दिला. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ९० धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात (India vs Zimbabwe) घातली.
आयपीएलमध्ये आपल्या शांत, संयमी आणि प्रभावी नेतृत्वामुळे “सरपंच” म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली. मात्र कर्णधार म्हणून त्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. तुलनेने नवख्या आयर्लंडकडून २-० आणि त्यानंतर इंग्लंडकडून ४-० असा पराभव स्वीकारावा लागल्याने श्रेयसवर जोरदार टीका झाली होती. सूर्यकुमार यादवला बाहेर बसवून श्रेयसला नेतृत्व देण्याचा निर्णयही अनेकांनी प्रश्नांकित केला होता. अशा परिस्थितीत झिम्बाब्वेविरुद्ध मिळालेला मालिका विजय भारतीय संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा (India vs Zimbabwe)ठरला.
झिम्बाब्वेचा संघ तुलनेने कमकुवत असला तरी सलग दोन सामने जिंकून मालिका खिशात घालणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे होते. विजय कोणत्याही प्रतिस्पर्ध्यावर मिळाला तरी तो संघाचा आत्मविश्वास उंचावणारा असतो, हेच या मालिकेत पुन्हा एकदा सिद्ध (India vs Zimbabwe)झाले .

सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर युवा वैभव सूर्यवंशी चांगल्या लयीत दिसत असतानाच अति आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात २० धावांवर बाद(India vs Zimbabwe) झाला.
यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी संयमी खेळ करत डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. श्रेयस २५ धावांवर बाद झाल्यानंतर उपकर्णधार तिलक वर्मा आणि ईशान किशन यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा समाचार (India vs Zimbabwe)घेतला.

ईशान किशनने आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत फलंदाजी करत अवघ्या ४४ चेंडूंमध्ये ८१ धावांची खेळी साकारली. त्याने ९ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत कारकिर्दीतील १३वे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच तो बाद झाला. दुसऱ्या बाजूला तिलक वर्माने संयमी पण प्रभावी खेळी करत आपले आठवे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. दोघांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २१९ धावांचा भक्कम डोंगर(India vs Zimbabwe) उभारला.
२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवातच खराब झाली. अवघ्या ३४ धावांत दोन फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांच्या डावाची घसरगुंडी सुरू झाली. मधल्या फळीतही भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत झिम्बाब्वेला कोणतीही मोठी भागीदारी उभारू दिली (India vs Zimbabwe)नाही.
मागील सामन्यात सामनावीर ठरलेल्या मयंक यादवला यावेळी एकही बळी मिळाला नाही. मात्र यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवी बिष्णोई आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला, तर अभिषेक शर्माने आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत १७ धावांत ३ बळी टिपले. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १२९ धावांत गारद झाला आणि भारताने ९० धावांनी दणदणीत विजय (India vs Zimbabwe)मिळवला.
झिम्बाब्वेकडून बेनेटने ३२, मारुमानीने २४, बर्लने २०, इव्हान्सने १९ आणि मायर्सने १२ धावा केल्या. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा प्रतिकार अपुरा (India vs Zimbabwe)ठरला.
सामन्यातील झंझावाती ८१ धावांच्या खेळीसाठी ईशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सलग दोन मालिका गमावल्यानंतर टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने अखेर विजयाची चव चाखत मालिका जिंकली. आता हा विजय आगामी आव्हानात्मक मालिकांसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावणारा(India vs Zimbabwe) ठरेल.
