(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जुलै २०२६ रोजी बहुभाषिक काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह निमंत्रित कवी-कवयित्रींनी मराठी व हिंदी भाषेतील विविध विषयांवरील दर्जेदार कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने (Sahitya Sangeet Kala) जिंकली.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी कवी प्रदीप निफाडकर, हिंदीतील प्रसिद्ध कवी, लेखक व अनुवादक सुनील देवघर तसेच हिंदी व बंगाली भाषेतील लेखिका आणि अनुवादक श्वेता सेन यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. यावेळी श्वेता सेन यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचे हिंदीत प्रभावी सादरीकरण (Sahitya Sangeet Kala)केले.
याशिवाय निमंत्रित कवी जया सरकार, शेफाली अंबष्ट, अनीता कुमार आणि स्वरांगी साने यांनीही आपल्या कवितांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वरांगी साने यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालनही(Sahitya Sangeet Kala) केले.
या प्रसंगी कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे संचालक राम रेना आणि साहित्य संगीत कला मंचाचे अध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनीही काव्यवाचन करून कार्यक्रमाची शोभा(Sahitya Sangeet Kala) वाढवली.

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या सरबजीत कौर, विद्यार्थ्यांचे पालक तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली आणि परीक्षित यांनी विशेष परिश्रम (Sahitya Sangeet Kala) घेतले.
बहुभाषिक साहित्य, कविता आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा सुंदर संगम घडवणारी ही काव्यसंध्या उपस्थित रसिकांसाठी अविस्मरणीय (Sahitya Sangeet Kala) ठरली.

