Home माझं पिंपरी चिंचवड RSS Keshavnagar :केशवनगर, चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा

RSS Keshavnagar :केशवनगर, चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संत गाडगेबाबा शाखा, केशवनगर (चिंचवड) येथे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जगन्नाथ देवीकर यांनी शिवचरित्रावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संत गाडगेबाबा शाखा, केशवनगर (चिंचवड) येथे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात (RSS Keshavnagar)आला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगन्नाथ देवीकर, पंजाबराव मोंढे तसेच संघ स्वयंसेवक मधुकर बच्चे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून (RSS Keshavnagar)झाली.

यानंतर जगन्नाथ देवीकर यांनी शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रकारण, शौर्य आणि आदर्श यांचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, “शिवरायांनी शस्त्रासोबतच शास्त्रालाही तितकेच महत्त्व दिले. प्रत्येक नागरिकाने ज्ञान, चारित्र्य, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा हे शिवरायांचे गुण जीवनात अंगीकारले, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीत योगदान देता (RSS Keshavnagar)येईल.”

या कार्यक्रमास संघ स्वयंसेवकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” आणि “जय भवानी… जय शिवाजी!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास जपण्याचा आणि शिवरायांचे विचार व आदर्श जीवनात रुजविण्याचा संकल्प(RSS Keshavnagar) केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00