Home गुन्हे Sujata Palande:निवडणुकीत हिंसक वळण; सुजाता पालांडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ केल्याचा आरोप

Sujata Palande:निवडणुकीत हिंसक वळण; सुजाता पालांडे यांच्या घरात घुसून शिवीगाळ केल्याचा आरोप

भाजप महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या घरी घुसखोरी व शिवीगाळ केल्याचा आरोप. अटक मागणीसाठी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :सुजाता पालांडे यांच्या घरी घुसखोरी व शिवीगाळ; संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात धरणे( Sujata Palande)आंदोलन

पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहराध्यक्षा तसेच महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व उमेदवार योगेश बहल यांच्या समर्थकांनी घुसखोरी करून घरातील सदस्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पालांडे यांनी केला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले(Sujata Palande)आहे.

या कथित घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या उमेदवार सुजाता पालांडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरू केले आहे. योगेश बहल यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत(Sujata Palande) आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनीही संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून अशा प्रकारांना कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट (Sujata Palande)केले.

संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तक्रार व पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी(Sujata Palande) सांगितले.

या घटनेमुळे संत तुकाराम नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत (Sujata Palande)आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00