Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Voter List-2025:PCMC प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर; हरकती 27 नोव्हेंबरपर्यंत

PCMC Voter List-2025:PCMC प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर; हरकती 27 नोव्हेंबरपर्यंत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर. नागरिकांना 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतील त्रुटी, आक्षेप किंवा आवश्यक बदल नोंदवण्यासाठी नागरिकांना 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारींवर गांभीर्याने कार्यवाही करावी, असे निर्देश निवडणूक अधिकारी तथा आयुक्त श्रावण हर्डीकर (PCMC Voter List-2025) यांनी दिले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त व निवडणूक विभागप्रमुख सचिन पवार, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, नगररचना विभागाचे प्रशांत शिंपी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि मतदार यादी कामकाजासाठी नियुक्त कर्मचारी उपस्थित (PCMC Voter List-2025) होते.


मतदार यादी कुठे उपलब्ध?

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी खालील ठिकाणी पाहता येईल:

  • महापालिकेचा मतदार यादी कक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह

  • मनपाची सर्व ८ क्षेत्रीय कार्यालये

  • महापालिकेची अधिकृत वेबसाइट: pcmcindia.gov.in

तसेच मतदारांना प्रभाग क्रमांक, विधानसभा क्रमांक, भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची mahasecvoterlist.in ही लिंक मनपाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदार EPIC क्रमांकावरून किंवा नावानुसारही यादीत माहिती शोधू शकतात. मतदारांनी यासाठी ऑनलाइन सुविधेचा अधिक वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे (PCMC Voter List-2025) यांनी केले.


हरकती आणि सूचना कशा सादर कराव्यात?

मतदारांनी आपल्या हरकती किंवा सूचना नमुना-अ किंवा नमुना-ब मध्ये आवश्यक पुराव्यासह 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर कराव्यात. पुराव्याचा अभाव किंवा मुदत संपल्यानंतर आलेल्या अर्जांवर विचार केला जाणार  (PCMC Voter List-2025)नाही.

हरकती/सूचना स्वीकारण्यासाठी खालील ठिकाणी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत:

  • मतदार यादी कक्ष – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पहिला मजला, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी

  • अ क्षेत्रीय कार्यालय – भेळ चौक, निगडी, प्राधिकरण निगडी

  • ब क्षेत्रीय कार्यालय – पिंपरी लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव

  • क क्षेत्रीय कार्यालय – नेहरूनगर, पॉलीग्रास ग्राउंडजवळ, MIDC भोसरी

  • ड क्षेत्रीय कार्यालय – औंध-रावेत रोड, रहाटणी

  • इ क्षेत्रीय कार्यालय – ग्रोथलॅब इमारत, पांजरपोळ समोर, पुणे-नाशिक रोड, भोसरी

  • फ क्षेत्रीय कार्यालय – जुनी एनव्हीए इमारत, लोकमान्य टिळक चौक, निगडी

  • ग क्षेत्रीय कार्यालय – तिसरा मजला, थेरगाव, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मागे

  • ह क्षेत्रीय कार्यालय – मुलींचे आयटीआय प्रशिक्षण केंद्र, (PCMC Voter List-2025)


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00