प्रतिनिधी –चिंचवड शहरालगतच्या हिंजवडी–मारुंजी परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला असून कसारसाई धरणावरून पर्यटन करून घरी परतत असताना आरएमसी ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणीचे नाव रीदा इमरान खान असे आहे. गेल्या काही दिवसांत मिक्सर/RMC ट्रकच्या धडकेमुळे झालेल्या अपघातांची ही दुसरी घटना असल्याने परिसरात ( Hinjawadi Accident) चिंतेचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रीदा आणि तिचा मित्र विवेक हे दोघे पुण्याहून कसारसाई धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. पर्यटनानंतर पुण्याकडे परतत असताना मारुंजीजवळ मागून आलेल्या एका आरएमसी ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे रीदा रस्त्यावर पडली व गंभीर जखमी झाली. उपचारापूर्वीच (Hinjawadi Accident) तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर हिंजवडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरएमसी ट्रक चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात सातत्याने RMC/मिक्सर ट्रककडून अपघात होत असल्याने पोलिस प्रशासन यापुढे काय कठोर भूमिका घेणार याकडे स्थानिकांचे लक्ष (Hinjawadi Accident) लागले आहे.
