Home माझं पिंपरी चिंचवड SSC exam guidance:शनिवार, दिनांक १० जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

SSC exam guidance:शनिवार, दिनांक १० जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर

लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे इयत्ता दहावीच्या एसएससी विद्यार्थ्यांसाठी १० जानेवारी २०२६ रोजी पिंपरीतील गदिमा नाट्यगृहात ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२६) :लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन ७, ८ व ९ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी (एस.एस.सी.) मार्च २०२६ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृहात होणार आहे.

या शिबिरासाठी सकाळी ११ वाजता नि:शुल्क नावनोंदणी करण्यात येणार असून, दुपारी ठीक १२ वाजता मार्गदर्शन शिबिरास सुरुवात होईल. या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे एमजेएफ ला. श्रेयस दीक्षित (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) यांच्या हस्ते होणार असून, ममता शिंदे (सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजेएफ ला. प्रदीप कुलकर्णी असतील.

यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन ७ चे चेअरमन हिरामण राठोड, झोन ८ चे चेअरमन मुकुंद आवटे, झोन ९ च्या चेअरमन उज्ज्वला कुलकर्णी तसेच उपक्रम समन्वयक अनुजा करवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या मार्गदर्शन शिबिरात एस.एस.सी. बोर्डाच्या अनुभवी मार्गदर्शक डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित) आणि अर्चिता मडके (एक्झाम टेक्निक्स) हे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी, अभ्यासपद्धती, वेळेचे नियोजन आणि उत्तरलेखन तंत्र याबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन गुणांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क सराव प्रश्नोत्तर संच देखील वितरित करण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी ९०४९९९२८०७ किंवा ९०४९९९२८०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00