आळंदी | प्रतिनिधी:महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर आला असून शहरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने वारकरी व भाविकांना आळंदीत न येण्याचे आवाहन केले (Aashadhi Wari 2026) आहे.
संस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, इंद्रायणी नदीच्या पुरामुळे नदीवरील वाहतूक बंद झाली आहे. पुलावरील कठडे आणि लाईटचे खांब वाहून गेले असून नगरपरिषदेचे वॉटरहाऊसही पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला(Aashadhi Wari 2026) आहे.
याशिवाय भाविकांसाठी उभारण्यात आलेली दर्शन व्यवस्था, मोबाइल टॉयलेट, लाईट व्यवस्था तसेच तंबूंचेही मोठे नुकसान झाले आहे. राहण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करणेही सध्या शक्य नसल्याचे संस्थानने स्पष्ट केले(Aashadhi Wari 2026) आहे.
या परिस्थितीचा विचार करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अत्यंत मर्यादित स्वरूपात पार पडणार (Aashadhi Wari 2026)आहे.
या सोहळ्यासाठी केवळ रथासमोरील निवडक दिंड्यांमधील प्रतिनिधी, मानकरी, सेवेकरी आणि आवश्यक अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. एकूण सुमारे १,९६० व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडेल, असे संस्थानने म्हटले(Aashadhi Wari 2026) आहे.
त्यामुळे सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी आळंदीत येण्याचे टाळावे तसेच पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने केले आहे. तसेच या निर्णयासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले(Aashadhi Wari 2026) आहे .
