Home माझं पिंपरी चिंचवड LPG New Rules 2026:१ जुलैपासून एलपीजी नियमांमध्ये मोठे बदल? व्हायरल दाव्यांमागचे सत्य काय?

LPG New Rules 2026:१ जुलैपासून एलपीजी नियमांमध्ये मोठे बदल? व्हायरल दाव्यांमागचे सत्य काय?

१ जुलै २०२६ पासून एलपीजी गॅस कनेक्शनचे नियम बदलणार असल्याचा दावा व्हायरल. 'वन होम, वन गॅस', ई-केवायसी आणि रिफिल लॉक-इनबाबत अधिकृत माहिती काय, जाणून घ्या.

by Admin
Spread the love

नवी दिल्ली : सोशल मीडियावर आणि काही संकेतस्थळांवर १ जुलै २०२६ पासून एलपीजी गॅस कनेक्शनसंदर्भात मोठे बदल लागू होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या दाव्यांमध्ये ‘वन होम, वन गॅस’ नियम, पीएनजी असलेल्या ग्राहकांनी एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे, ई-केवायसी अनिवार्य करणे आणि रिफिल बुकिंगसाठी लॉक-इन कालावधी लागू होणार असल्याचा उल्लेख (LPG New Rules 2026)आहे.

 

मात्र, या दाव्यांबाबत केंद्र सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या (इंडेन, भारत गॅस, एचपी गॅस) यांनी अधिकृतपणे अशी घोषणा केल्याची पुष्टी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित गॅस कंपनीकडून माहितीची खातरजमा (LPG New Rules 2026)करावी.

 

दरम्यान, दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेत असल्याने १ जुलै रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता (LPG New Rules 2026)आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00