(मारुती भापकर ):१९८८-८९ च्या कालखंडात मी शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून श्रीराम जन्मभूमी आंदोलनाशी जोडला गेलो. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून देशभर जनजागृती सुरू होती. लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात विविध कार्यक्रम, सभा आणि जनजागृती अभियानांमध्ये सक्रिय सहभाग (Alleged Irregularities)घेतला.
या आंदोलनादरम्यान लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, प्रवीण तोगडिया, विनय कटियार, आचार्य धर्मेंद्र यांसारख्या अनेक नेत्यांची भाषणे प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. कारसेवक म्हणूनही आंदोलनाच्या विविध टप्प्यांत सहभागी होण्याचा योग (Alleged Irregularities)आला.
त्या काळात “जय श्रीराम”, “सौगंध राम की खाते हैं, हम मंदिर वहीं बनाएंगे” अशा घोषणा देशभर घुमत होत्या. प्रभू श्रीरामांवरील श्रद्धेमुळे लाखो कार्यकर्त्यांनी तन, मन आणि धन अर्पण केले. अनेकांनी कारावास भोगला, अनेकांनी बलिदान दिले, तर अनेक कुटुंबांनी मोठा त्याग (Alleged Irregularities)केला.
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाचा पाडल्यानंतर देशभर दंगली आणि हिंसाचार झाला. अनेक निष्पाप नागरिकांचा त्यात बळी गेला. त्यानंतर अनेक वर्षे हा वाद सर्वोच्च न्यायालयात चालला आणि अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना करून मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा (Alleged Irregularities)झाला.
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने या मंदिरासाठी आर्थिक योगदान दिले. उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार देणग्या दिल्या. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे प्रतीक(Alleged Irregularities) आहे.
अशा परिस्थितीत मंदिरातील कथित चोरी, दानपेटीतील गैरव्यवहार, दागिने गायब होणे, जमीन व्यवहारांतील कथित अनियमितता आणि मंदिर बांधकामातील कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या बातम्या अत्यंत वेदनादायी आहेत. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली(Alleged Irregularities) पाहिजे.
या प्रकरणामुळे कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांनी या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता ठेवून जनतेसमोर सत्य मांडणे गरजेचे आहे. श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत कोणतीही शंका राहू नये, हीच प्रत्येक रामभक्ताची अपेक्षा (Alleged Irregularities)आहे.
जर गैरव्यवहाराचे आरोप सत्य ठरत असतील, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, आवश्यक असल्यास ट्रस्टच्या कार्यपद्धतीचा फेरआढावा घ्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था (Alleged Irregularities)उभारावी.
आज मागे वळून पाहताना मनात एकच प्रश्न निर्माण होतो—ज्या श्रद्धेने आणि समर्पणाने आम्ही या आंदोलनात सहभागी झालो, त्या श्रद्धेचा सन्मान आजही तितक्याच प्रामाणिकपणे जपला जात आहे(Alleged Irregularities) का?
प्रभू श्रीराम हे कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नसून संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित प्रत्येक व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेच्या विश्वासाला पात्र असणे हीच खरी रामभक्ती (Alleged Irregularities)आहे.
