Home आरोग्य Sangvi District Hospital: सांगवी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर; आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

Sangvi District Hospital: सांगवी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर; आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

सांगवी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी केली. आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश.

by Admin
Spread the love

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४ ): पिंपरी-चिंचवड व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाचे ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी दिली. शनिवारी त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी करत आरोग्य सुविधांचा आढावा (Sangvi District Hospital)घेतला.

 

यावेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी रुग्णालयाच्या उन्नतीसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती मंत्र्यांना दिली. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित (Sangvi District Hospital)होते.

 

रुग्णालयातील आरोग्य सेवा, रुग्ण सुविधा, औषधसाठा, आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री तसेच उपचार व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक सुधारणा व तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना (Sangvi District Hospital)दिल्या.

 

डॉ. आबिटकर म्हणाले, “सांगवी जिल्हा रुग्णालयात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून तिचा अधिक प्रभावी वापर करून सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा मिळाल्यानंतर हृदयरोग, मेंदूविकार, किडनी विकार आदी गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचाराची सुविधा उपलब्ध (Sangvi District Hospital)होईल.”

यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मुंबई किंवा महागड्या खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. सांगवी जिल्हा रुग्णालयाला सुपर स्पेशालिटीचा दर्जा मिळाल्यास गरीब व सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक आणि मोफत आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध (Sangvi District Hospital)होईल.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00