Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Employees:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ

PCMC Employees:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर सेवानिवृत्त झालेल्या ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालिका प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप समारंभ पार पडला.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या २१ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात (PCMC Employees) आला.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, नंदकुमार इंदलकर, मुख्य लिपिक माया वाकडे, विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित (PCMC Employees) होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी प्रकाश ज्ञानोबा जाधव, कार्यालय अधीक्षक दौलत मदगे, सहायक उद्यान निरीक्षक सुरेश कोळेकर, कॉम्प्युटर ऑपरेटर सुरेखा झेंडे व ज्ञानेश्वर शेडगे, मुख्याध्यापक सविता जाधव व जयश्री गळीतकर, उपशिक्षिका संगीता रोकडे, उज्ज्वला तापकीर व शिला सोनवणे, सर्व्हेअर मुकुंद क्षिरसागर, सुरक्षा सुपरवायझर भारत भले, रखवालदार राजेंद्र रायकर, ईश्वर बहोत व चंद्रकांत राऊळ, मजूर दत्तात्रय काळभोर, दत्तात्रय टोपे, दिलीप गव्हाणे व शंकर धुमाळ तसेच सफाई सेवक अशोक कांबळे आणि ज्योतीराम खैरमोडे यांचा समावेश (PCMC Employees)आहे.

स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेल्यांमध्ये उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण सुपे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे व मनोहर जावरानी, वायरलेस ऑपरेटर श्रीकृष्ण बाबर, दूरध्वनी चालक जालिंदर साखरे, मुकादम राकेश गायकवाड, वंदना ओव्हाळ व शालन करडे तसेच सफाई कामगार राजू शिंदे, बापू गायकवाड, अनिता रेड्डी, नमिना चव्हाण, सफाई सेवक राणू गायकवाड आणि भारत गायकवाड यांचा समावेश (PCMC Employees)आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर मुख्य लिपिक माया वाकडे यांनी उपस्थितांचे आभार (PCMC Employees)मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00