पिंपरी-चिंचवड, दि. १६ जानेवारी २०२६ :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मधील चारही गटांचे निकाल जाहीर झाले असून, या प्रभागात शिवसेनेने तीन जागांवर दणदणीत विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर भारतीय जनता पार्टीने एका गटात विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मात्र चारही गटांत पराभवाचा सामना करावा लागला (Ward 16 Result) आहे.
अ गटात भाजपचा विजय
प्रभाग १६ (अ गट) मध्ये भारतीय जनता पार्टीचे तंतरपाळे धर्मपाल यशवंतराव यांनी १४,८६३ मते मिळवत विजय संपादन केला. शिवसेनेचे बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांना १४,१८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेया अक्षय तरस गायकवाड यांना १३,१६६ मते मिळत तिसरा क्रमांक मिळाला. या गटात NOTA ला १,२७५ मते (Ward 16 Result)मिळाली.
ब गटात शिवसेनेचा स्पष्ट कौल
प्रभाग १६ (ब गट) मध्ये शिवसेनेच्या ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी १७,७८१ मते मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री मोरेश्वर भोंडवे (१२,६६० मते) दुसऱ्या, तर भाजपच्या राऊत शिल्पा मोहन (११,८९२ मते) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. येथे NOTA ला ९७४ मते(Ward 16 Result) मिळाली.
क गटात शिवसेनेचा दणदणीत विजय
प्रभाग १६ (क गट) मध्ये शिवसेनेच्या कातळे रेश्मा बापुजी यांनी २०,०४० मते मिळवत दणदणीत विजय नोंदवला. भाजपच्या भोंडवे संगीता राजेंद्र यांना १३,४९३ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा तानाजी भोंडवे यांना ९,२२७ मते मिळाली. NOTA ला (Ward 16 Result) १,१४५ मते मिळाली.
ड गटात शिवसेनेची बाजी
प्रभाग १६ (ड गट) मध्ये शिवसेनेचे निलेश गुलाब तरस यांनी १७,६०२ मते मिळवत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्वर महादू भोंडवे (१२,८७८ मते) आणि भाजपचे दीपक मधुकर भोंडवे (१२,७१५ मते) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या गटात NOTA ला ६५५ मते (Ward 16 Result)मिळाली.
राजकीय चित्र स्पष्ट
एकूण निकाल पाहता प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेने तीन गटांत विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर भाजपला एका गटात समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चारही गटांत पराभव स्वीकारावा लागल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे लक्षणीयरीत्या बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले (Ward 16 Result)आहे.
