Home मनोरंजन Raje Umaji Naik:आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक ‘क्रांतीतीर्थ’ व्हावे : संदीप तापकीर

Raje Umaji Naik:आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक ‘क्रांतीतीर्थ’ व्हावे : संदीप तापकीर

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मामलेदार कचेरी येथे राजे उमाजी नाईक यांना अभिवादन; शब्दधन काव्यमंचाच्या वतीने देशभक्तीपर काव्यसंमेलनाचे आयोजन.

by Admin
Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शब्दधन काव्यमंचाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पुण्यातील मामलेदार कचेरी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने ऐतिहासिक वास्तूत देशभक्तीपर काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात (Raje Umaji Naik)आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अभ्यासक शिवाजीराव शिर्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक व विश्वकर्मा पब्लिकेशनचे संपादक संदीप तापकीर उपस्थित होते. तसेच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, सचिव सुनील जाधव, राजे उमाजी नाईक यांचे सातवे वंशज श्रीकांत खोमणे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, उत्तम धनवटे, वेदांतश्री प्रकाशनचे संपादक सुनील उंब्रजकर, ह.भ.प. अशोक महाराज गोरे, दत्ता कांगळे आदी मान्यवर उपस्थित(Raje Umaji Naik) होते.

मामलेदार कचेरीच्या प्रवेशद्वारापासून ‘क्रांतिवीर राजे उमाजी नाईक अमर रहे’ अशा घोषणा देत साहित्यिकांनी मिरवणूक काढली. स्मारकाच्या प्रांगणातील ऐतिहासिक वास्तूंना नमन करून क्रांतीचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात (Raje Umaji Naik)झाली.

शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी शंखनाद करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी काव्यमंचाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी ‘हे वंदन आमुचे क्रांतिकारका…’ ही कविता सादर (Raje Umaji Naik)केली.

यावेळी इतिहास अभ्यासक संदीप तापकीर म्हणाले, “ब्रिटिशांच्या जुलूमशाहीविरुद्ध आवाज उठवणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक होते. त्यांच्या बलिदानाने पावन झालेले हे स्मारक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्याचे जतन होणे गरजेचे असून, या स्मारकाचे ‘क्रांतीतीर्थ’ म्हणून संवर्धन झाले (Raje Umaji Naik)पाहिजे.”

रानकवी जगदीश वनशिव, सीताराम नरके, संजय गमे, राधाबाई वाघमारे, शामराव सरकाळे, कांचन नेवे, बाळकृष्ण अमृतकर, ज्योती देशमुख, सुरेखा हिरवे, रेखा दुसाने, सुनीता घोडके, अण्णा उमरगे, मोहम्मद शरीफ मुलाणी, बाळासाहेब साळुंखे, प्रकाश रसाळ, नंदकिशोर गावडे आणि अरुण घोडके आदी कवींनी देशभक्तीपर कविता सादर करून वातावरण भारावून टाकले. समीक्षक व लेखक नारायण कुंभार यांनी कवींनी सादर केलेल्या कवितांचा आढावा (Raje Umaji Naik)घेतला.

स्मारक समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण म्हणाले, “देशासाठी लढलेल्या क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्मारक समिती कार्यरत (Raje Umaji Naik)आहे.”

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना इतिहास अभ्यासक शिवाजीराव शिर्के म्हणाले, “ऐतिहासिक वास्तूंचे जतन झाले पाहिजे. नव्या युवा पिढीसाठी हे स्मारक प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान(Raje Umaji Naik) ठरेल.”

कवी तानाजी एकोंडे यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले. शंकर नाणेकर, पांडुरंग सुतार आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सामूहिक ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता (Raje Umaji Naik)झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00