Home आरोग्य Ward 15 Public Safety:प्रभाग १५ मधील धोकादायक केबल्स हटवण्याची मागणी; प्रशासनाला इशारा

Ward 15 Public Safety:प्रभाग १५ मधील धोकादायक केबल्स हटवण्याची मागणी; प्रशासनाला इशारा

पिंपरीतील प्रभाग १५ मध्ये लोंबकळणाऱ्या धोकादायक व अनधिकृत केबल्स हटवण्याची मागणी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी आयुक्तांकडे केली असून, तात्काळ कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. ३०) : प्रभाग क्र. १५ मधील अनधिकृत व धोकादायक केबल्स आणि वायरचे जाळे तात्काळ हटवण्याची मागणी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली  (Ward 15 Public Safety) आहे.

 

मोरे यांनी दिलेल्या निवेदनात प्रभागात विविध कंपन्यांच्या इंटरनेट व डिश टीव्ही केबल्स मोठ्या प्रमाणावर लोंबकळत असून त्या झाडांवर, भिंतींवर व रस्त्यांवर खालच्या स्तरावरून गेलेल्या असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. सेक्टर २६, निगडी येथे अशाच केबलमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावरही बोट(Ward 15 Public Safety) ठेवले.

 

या पार्श्वभूमीवर प्रभागातील सर्व धोकादायक व अनधिकृत केबल्स तात्काळ हटवून संपूर्ण शहरात अशा वायरचे सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला (Ward 15 Public Safety) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00