Maharashtra crime
Child Abuse Bhosri :संतापजनक मोशीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत (Child Abuse Bhosri)आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील विनायकनगर, शिवशंभो कॉलनीमध्ये ही घटना घडली. रामु कुंजल निसाद (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, कोणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी (Child Abuse Bhosri ) दिली.
धक्कादायक बाब म्हणजे, ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पुन्हा आरोपीने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव (Child Abuse Bhosri) घेतली.
Crime Branch Unit 1 :पिंपरी-चिंचवड : वृद्ध महिलांच्या सोनसाखळी चोरी करणारी आंतरराज्य महिला टोळी जेरबंद | गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई
प्रतिनिधी :बसस्टँड व गर्दीच्या ठिकाणी वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य महिला टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. अवघ्या एक तासांत तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, स्पोर्ट बाईक असा सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Crime Branch Unit 1) आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढलेल्या सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार निगडी बसस्टँड, मधुकर पवळे उड्डाणपूल परिसरात तीन महिला वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने काढून पळ काढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई (Crime Branch Unit 1)केली.
या कारवाई दरम्यान तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वृद्ध महिलांना लक्ष्य करून सोन्याच्या मणी-मंगळसूत्र व दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासामध्ये सदरच्या महीलांची अंतरराज्य चोरी करणारी टोळी असुन त्यांच्यावर अफजलपुर, गुलबर्गा, विजयपुरा, राज्य कर्नाटक तसेच बाद्रा, परभणी, दादर, कुर्ला, महाराष्ट्र येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याच तपासात चोरीस मदत करणाऱ्या आणखी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असून तिच्याकडून घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच मोटारसायकल चोरी प्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली (Crime Branch Unit 1) आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक पोलीस उप निरिक्षक सुर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, पोलीस शिपाई सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उध्दव खेडकर, दिपक तांदळे, केशव चेपटे यांनी केली (Crime Branch Unit 1) आहे.
