प्रतिनिधी :अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आणि अक्षरमंच मासिक वृत्तपत्र ‘न्यायप्रभात’ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील साहित्यिकांच्या लेखणीला बळ देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धात्मक उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत विविध विषयांवर काव्यलेखन करणाऱ्या साहित्यिकांचा भव्य पुरस्कार सोहळा नुकताच श्रीक्षेत्र आळंदी येथे संपन्न (Dr Jayadrath Akhade)झाला.
या स्पर्धात्मक उपक्रमात सलग दोन वर्षे उत्कृष्ट व सर्वोत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल पुणे येथील साहित्यिक डॉ. श्री. जयद्रथ आखाडे यांना ‘अष्टपैलू अक्षरभूषण राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार – २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व प्रसिद्ध कलाकार डॉ. मधुसूदन घाणेकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री. शिवाजी किसन खैरे सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात(Dr Jayadrath Akhade) आला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सहसंपादक व कोषाध्यक्ष ह.भ.प. सौ. अनुसया खैरे मॅडम, नाशिक जिल्हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना (महाराष्ट्र शासन) प्रकल्पाचे I.C.D.S. अधिकारी व साहित्यिक श्री. प्रताप पाटील, जिल्हा उच्च न्यायालय, संभाजीनगर येथील ॲड. विनोद गोल्हार यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील अनेक नामवंत साहित्यिकांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली(Dr Jayadrath Akhade) होती.
https://youtube.com/watch?v=HAYM8mB7eO8&si=uXRbdy_J10E_9fRa

1 comment
अतिशय उत्कृष्ट, सुशोभनीय. बातमीचे पिंपरी चिंचवड शहराचे पोर्टल. सामाजिक चळवळ उभी करावी हि नम्र विनंती