पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या आणि सक्षम न्यायव्यवस्थेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जात असून, शहराला आता स्वतःचे हक्काचे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय” लाभत आहे. या न्यायालयाचे भव्य लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. संदीप मारणे व मा. श्री. आसिफ डॉक्टर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून, पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. एम. के. महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार (Pimpri Chinchwad court) आहे.
पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक व लोकसंख्येच्या शहरासाठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची आवश्यकता दीर्घकाळापासून जाणवत होती. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे न्यायप्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ व प्रभावी होणार असून, नागरिकांना वेळेत आणि सहज न्याय मिळण्यास मोठी मदत होणार (Pimpri Chinchwad court)आहे.
ही केवळ प्रशासकीय घडामोड नसून, शहरातील सर्वसामान्य नागरिक, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. वाढत्या न्यायालयीन कामकाजाचा भार लक्षात घेता, हे अतिरिक्त न्यायालय नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारे आणि लोकाभिमुख न्यायप्रणालीचा आदर्श निर्माण करणारे (Pimpri Chinchwad court)ठरेल.

पिंपरी-चिंचवड शहर हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांपैकी एक असून, येथे औद्योगिक, फौजदारी, दिवाणी तसेच श्रमविषयक प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थापनेमुळे न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होणार (Pimpri Chinchwad court)आहे.
या न्यायालयामुळे नागरिकांना न्यायासाठी पुणे न्यायालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळेची व आर्थिक बचत होईल आणि न्यायप्रणालीवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. तसेच वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी व संबंधित यंत्रणांसाठीही कामकाज अधिक सुसूत्रपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा होणार (Pimpri Chinchwad court)आहे.
या न्यायालयाच्या स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे सर्व लोकप्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, पोलीस प्रशासन, वकील बंधू-भगिनी तसेच जागरूक नागरिक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच हा महत्त्वाचा टप्पा साकार झाला (Pimpri Chinchwad court) आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या न्यायालयीन हक्कासाठीचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी आणि लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी नागरिक व वकील यांनी मोठ्या संख्येने उपस्थित (Pimpri Chinchwad court)राहावे.”
— अॅड. उमेश राम खंदारे
सचिव, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन
