पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला होता. निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू झाले होते. या प्रक्रियेत संदीप वाघेरे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या संजोग वाघेरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची चर्चा सुरू झाली. या निर्णयाला संदीप वाघेरे यांनी तीव्र विरोध केला. मात्र भाजप नेतृत्वाने त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत संजोग वाघेरे यांना पक्षात प्रवेश दिला.या घटनेनंतर संदीप वाघेरे यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. या पक्षांतरामुळे पिंपरीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे (Sandip Waghere Power )बदलली.
अजित पवारांचा विश्वास, संदीप वाघेरेंच्या खांद्यावर जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संदीप वाघेरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अजित पवारांनी दाखवलेल्या या विश्वासाला संदीप वाघेरे यांनी पूर्ण न्याय दिला. त्यांनी केवळ स्वतः विजय मिळवला नाही, तर संपूर्ण पॅनलला दणदणीत यश मिळवून दिले.संदीप वाघेरे यांनी भाजपचे उमेदवार गणेश ढाकणे यांचा तब्बल 16 हजार 430 मतांच्या भरघोस मताधिक्याने पराभव केला. या पराभवामुळे गणेश ढाकणे यांचे डिपॉझिटही जप्त झाले. या निकालानंतर संदीप वाघेरे हे केवळ विजयी उमेदवार न राहता, या प्रभागातील ‘किंगमेकर’ म्हणून पुढे आल्याचे चित्र स्पष्ट झाले (Sandip Waghere Power) आहे.
चारही जागांवर राष्ट्रवादीचा गजर
या निवडणुकीत पिंपरीतील चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व गाजवत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. घड्याळाच्या चिन्हाचा गजर करत राष्ट्रवादीने संपूर्ण प्रभागात आपले राजकीय बळ सिद्ध केले. त्यामुळे संदीप वाघेरे यांच्यासारखा प्रभावी मोहरा हातातून घालवण्याची भाजपची चूक चांगलीच महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली (Sandip Waghere Power)आहे.
स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित; सर्वसमावेशक प्रचार
संदीप वाघेरे यांनी आपल्या प्रचारात स्थानिक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्द्यांवर विशेष भर दिला. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, युवकांचे प्रश्न आणि महिलांच्या समस्यांवर त्यांनी ठोस आणि स्पष्ट भूमिका मांडली.
‘ना जात, ना धर्म – विकास हा एकमेव अजेंडा’ ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडत सर्व समाजघटकांशी थेट संवाद साधला. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे विविध घटकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि त्याचे प्रतिबिंब थेट मतपेटीतून (Sandip Waghere Power)उमटले.
राजकीय वजनात मोठी वाढ; महापालिकेत निर्णायक भूमिका
या विजयामुळे संदीप वाघेरे यांचे पिंपरीतील राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. महापालिकेतील पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतही संदीप वाघेरे यांची भूमिका आता निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.भाजपसाठी हा पराभव आत्मपरीक्षणाची वेळ असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पिंपरीत पुन्हा एकदा घड्याळाचा ठसा अधिक ठळकपणे उमटल्याचे चित्र दिसून येत (Sandip Waghere Power) आहे.
