प्रतिनिधी :थेरगाव परिसरातील पवना नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी (Pavana River Pollution) दिले.
सभापती बारणे यांनी पर्यावरण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत थेरगाव येथील बोट क्लब परिसराचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान नदीपात्रात साचलेला कचरा, प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती उघडकीस आली. या सर्व बाबींमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य, शेती आणि नदीतील जैवविविधता धोक्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त (Pavana River Pollution)केली.
या दौऱ्यात नदी स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात (Pavana River Pollution)आले.

प्रतिक्रिया :
“पवना नदीचे प्रदूषण ही अत्यंत गंभीर बाब असून, ती रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नदीपात्रात कचरा टाकणारे किंवा बेकायदेशीरपणे सांडपाणी सोडणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच नदी स्वच्छतेसाठी विशेष मोहीम तातडीने राबवण्यात येईल,” असे अभिषेक बारणे यांनी (Pavana River Pollution)सांगितले.
