प्रतिनिधी :पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करत देशवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कोविड काळाप्रमाणेच कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट (Modi Statement) केले.
Iran आणि Israel यांच्यात वाढत असलेल्या संघर्षाचा जागतिक स्तरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मोदी यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेवर, ऊर्जा सुरक्षेवर आणि परराष्ट्र धोरणावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. संभाव्य इंधन टंचाई, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे आणि आर्थिक स्थैर्याच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य(Modi Statement) केले.
याआधी झालेल्या उच्चस्तरीय मंत्रिमंडळ बैठकीत मध्यपूर्वेतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. भारताच्या तेल आयातीवर, खतांच्या पुरवठ्यावर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी (Modi Statement)दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, युद्धग्रस्त प्रदेशाशी भारताचे व्यापक व्यापारी संबंध आहेत आणि हा भाग कच्चे तेल व नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. Strait of Hormuz मधील वाहतुकीवर परिणाम होत असला, तरी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी (Modi Statement)सांगितले.
पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत, हे संकट लवकरात लवकर संपवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित (Modi Statement)केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांनी विरोधकांवर टीका केली. कोविड काळात विरोधी पक्षाने केवळ टीका केली, मात्र सरकारने त्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर केल्याचे त्यांनी(Modi Statement) म्हटले.
