Home तंत्रज्ञान Pimpri Nigdi Metro :पिंपरी-निगडी मेट्रो प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण; राज्य सरकारची घोषणा

Pimpri Nigdi Metro :पिंपरी-निगडी मेट्रो प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण; राज्य सरकारची घोषणा

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचे काम जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार. 910 कोटींचा प्रकल्प, 4 स्थानके आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी ते निगडी (भक्ती-शक्ती चौक) दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती (Pimpri Nigdi Metro)  दिली.

 

पिंपरी ते निगडी या ४.४१ किलोमीटर लांबीच्या उन्नत मेट्रो मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यापूर्वी हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने आता अधिकृतपणे जानेवारी २०२७ ही नवीन अंतिम मुदत जाहीर केली आहे. ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, प्रकल्पातील १५३ पैकी ११८ पायाभरणीची कामे पूर्ण झाली असून, १०४ खांबांचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर(Pimpri Nigdi Metro)  आहे.

 

सुमारे ९१०.१८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक ही चार महत्त्वाची स्थानके असणार आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार (Pimpri Nigdi Metro)  आहे.

 

मेट्रो प्रकल्पात कोणताही तांत्रिक विलंब होऊ नये, यासाठी प्रशासनाने लिफ्ट, एस्केलेटर आणि ओव्हरहेड केबल्ससाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया आगाऊ पूर्ण केल्या (Pimpri Nigdi Metro) आहेत.

 

दरम्यान, विधिमंडळाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या पाणी प्रश्नावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ७५० एमएलडी पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पवना आणि आंध्रा धरणातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले (Pimpri Nigdi Metro) आहे.

 

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, पिंपरी-निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होईल. मुळा नदी सुधार योजनेचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पवना आणि इंद्रायणी नद्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. भामा-आसखेड प्रकल्प संथगतीने सुरू असल्याने संबंधित ठेकेदाराला निलंबित करण्यात आले (Pimpri Nigdi Metro) आहे.

 

शहरासाठी पवना धरणातून ५२० एमएलडी आणि आंध्रा धरणातून १०० एमएलडी, असे एकूण ६२० एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी संयुक्त आराखड्यावर काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी (Pimpri Nigdi Metro)  दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00