पिंपरी प्रतिनिधी
भोसरी एमआयडीसीतील ज्योती सोल्यूशन वर्क्स कंपनीतील तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष गणपत नलवडे (रा. मोशी) असे आरोपीचे नाव आहे. कंपनीचे साहित्य घेऊन गेलेल्या नलवडे यांनी ते परत न केल्याने कंपनीचे नुकसान झाल्याची फिर्याद अमोल अशोक स्वामी यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक आणि अपहारासंबंधी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
—
मोशीतील चाकू हल्ला; भांडण सोडविण्यास गेलेल्या दोघा भावांना गंभीर जखमी
पिंपरी –मोशीतील वरस्ता परिसरात शनिवारी (दि. २२) सकाळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोन भावांवर चाकूने हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजू छोटक बिंड (रा. जाधववाडी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जुनाकुमार हरिषसिंग यादव (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) याला अटक केली.
मनोजकुमार विंड आणि आरोपी यादव यांच्यातील वाद सोडवण्यासाठी राजू बिंड मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केला. राजू यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ गिरेंद्र विंड गेले असता आरोपीने त्यांच्यावरही वार केला. पुढील तपास सुरू आहे.
